वसुंधरा महोत्सवात यावर्षी पाहिंल्यादाच पर्यावरण साहित्य संमेलन योजण्यात आले आहे.
याचेऔचित्य साधून पर्यावरण आणि निसर्गासाठी लिखाण करणारे जेष्ठ लेखक श्री. मारुती चितमपल्ली
यांना लिमजी जलगाववाला वसुंधरा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
श्री. मारुती चितमपल्ली यांनी २००६ मध्ये सोलापूर येथे संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे.
त्यांनी निसर्ग आणि वन्यजीवावर विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या प्रमुख साहित्य संपदेमध्ये रातवा, रानवाटा, निळावंती, पक्षीकोश,
प्राणीकोश, सुवर्णगरुड, निसर्गवाचन, शब्दांचे धन, जंगलाच देण, मृगपक्षीशास्त्र, केशराचा पाऊस, घरट्या पलीकडे, आनंददायी
बगळे, पक्षी जाय दिगंतरा, चकवा चांदण : एक वनोपनिषद अशा अनेक पुस्तकांचा प्रामुख्याने समावेश होतो.